बहि:स्थ प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:स्थच्या (एक्‍सटर्नल) विभागाची प्रवेश प्रक्रिया येत्या मंगळवारपासून (21 ऑगस्ट) सुरू झाली आहे. पदवी प्रथम वर्ष व पदव्युत्तर प्रवेशाच्या प्रथम वर्षाला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील बहि:स्थ विभागाच्या लिंकवरही विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.
बहि:स्थ विभागाच्या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रोफाइल तयार करायचे आहे. हे प्रोफाइल तयार करताना विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक आवश्‍यक असेल. विद्यार्थ्यांनी लॉग आयडी तयार केल्यानंतर त्यांना त्यांची वैयक्तिक माहिती त्यावर भरावी लागेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वगळता राज्यात एकाही विद्यापीठात बहि:स्थ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या बहि:स्थ प्रवेशाला मोठी गर्दी असते. बहि:स्थ विभागातून मिळालेली पदवी इतर कोणत्याही विद्यापीठाच्या समकक्ष मानली जाते. तसेच, गेल्या काही दिवसांत तीन पट अधिक आकारले जाणारे शुल्कही आता संघटनांच्या मागणीनंतर कमी करण्यात आले असल्याने अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)