बहिरवाडी येथे गाळ काढण्याचे काम सुरू

काळदरी- ग्रामीण भागातील लोक गट-तट आणि मतभेद विसरून पाणी फाउंडेशनच्या वॉटर कपसाठी श्रमदान करीत आहेत. दुष्काळमुक्तीसाठी गावागावांत चांगुलपणाचा वणवा पेटला आहे. या मोहिमेअंतर्गत बहिरवाडी (ता. पुरंदर) येथे किल्लृयाच्या ओढ्यावरील माती बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू केल्याची माहिती बहिरवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य दशरथ जानकर यांनी दिली.
सेवावर्धिनी संस्थेच्या वतीने गावोगावी जल व मृदा संधारणाची कामे करण्यात येतात. संस्था ग्रामस्थांना सहभागी करून घेते, त्यांना ज्ञान देते आणि त्यांना श्रमदान महत्त्वही समजून देते, जेणेकरून गाव जलसाक्षर होईल. बहिरवाडी येथील बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साठलेला होता. गाळ साठल्यामुळे पाणीसाठा कमी झाला आणि बंधाऱ्याला गळती देखील असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नव्हते. हीच बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्य दशरथ जानकर यांनी सेवावर्धिनी संस्थेकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि हे काम मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
गाळ काढण्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी सेवावर्धिनी संस्थेचे प्रमोद कुलकर्णी, तुषार निरगुडे, हरीश पाटील, सोमनाथ कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य दशरथ जानकर, सुनीता कोकरे, रामचंद्र भगत, विलास भगत, सोपान कारकुड, संतोष ढगारे, बाळू शेलार, मोहन वाघमारे, सहदेव वांभिरे, सर्जेराव पढेर, उत्तम बेंगळे, बाळासो वांभिरे, शिवराम वांभिरे, किरण कारकुड, अमोल भगत, बनुबाई ढगारे, चतुराबाई ढगारे, धोंडिबा कोकरे, भुजंग भगत आदींसह महिला व ग्रामस्थांनी उपस्थित राहून श्रमदानात सहभाग घेतला. श्रमदानासाठी सुमारे दीडशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
501 :thumbsup:
101 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)