बहिणाबाई प्राणी संग्रहालयात मानधनावर भरती

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात मानधन तत्त्वावर तीन पदे भरण्यात आली आहेत. त्यापैकी पशूवैद्यक अधिकारी पदावरी नियुक्तीला मुदतवाढ देण्यात आली आहे. या तीनही अधिकाऱ्यांच्या मासिक मानधनावर होणाऱ्या खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील सर्पांचे मृत्यू, मगरीच्या पिलांची व अजगराची चोरी अशा अनेक कारणांमुळे हे प्राणी संग्रहालय वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यानंतर या प्राणीसंग्रहालयाच्या देखभालीची निकड प्रकर्षाने जाणवू लागली होती. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने या प्राणी संग्रहालयाच्या नुतनीकरणाला मान्यता दिली आहे. त्यानुसार डॉ. घश्‍याम पवार यांच पशूवैद्यक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचे काम समाधानकारक असल्याने सरळसेवा भरती होईपर्यंत त्यांच्या मानधन तत्वावरील नियुक्तीचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे. याशिवाय 30 हजार रुपये मानधनावर प्राची मयेकर (कलगुटकर) यांची बायोलॉजिस्ट पदावर तर दीपक सावंत यांची देखील 30 हजार रुपये मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण दगडे यांच्याकडे बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाच्या संचालकपदाचा भार सोपविण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)