बहिःस्थ अभ्यासक्रम प्रवेशअर्जास मुदतवाढ

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:स्थ अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी दि. 5 सप्टेंबर, तर पदव्युतरसाठी विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना दि. 15 सप्टेंबर अर्ज करता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या बहि:स्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
विद्यापीठाच्या बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत होती. मात्र विद्यार्थ्यांना आणखी प्रवेशाची संधी मिळावी, या उद्देशाने अर्ज करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. यंदा प्रथमच बहि:स्थच्या बीए, बीकॉमच्या प्रथम वर्षासाठी अर्ज करू इच्छितात, त्यांना दि. 5 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. त्याचप्रमाणे एमए व एमकॉमच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी दि. 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. मात्र पदवी व पदव्युत्तरच्या द्वितीय वर्षासाठी अर्ज करण्याची मुदतही 5 सप्टेंबरपर्यंत आहे, अशी माहिती बहि:स्थ विभागाचे डॉ. शिवाजी आहिरे यांनी दिली.
दरम्यान, यंदा बहि:स्थ अभ्यासक्रम प्रवेशासाठी तिपटीने शुल्क कमी करण्यात आले आहे. तरीही अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्जासाठी मुदत वाढवून देण्यात आल्याचे दिसून येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)