पिंपरी – चंदननगर ते भोसरी असा बस प्रवास करत असताना महिलेचे दोन तोळे वजनाचे सोने चोरीला गेले आहे. ही घटना सोमवारी (दि.27) दुपारी साडे बाराच्या सुमारास पीएमपीएमल बसमध्ये घडली.

याप्रकरणी नलिनी शंकरराव राख (वय- 60 रा- चंदननगर,पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दिली आहे. राख या चंदननगर येथून एका नातेवाईकाकडे भोसरी येथे जात होत्या यावेळी त्या मोबाईलवर आलेला कॉल पहात असताना पर्सची चैन उघडी होती.

अज्ञाताने या संधीचा फायदा घेत पर्समधील दोन तोळे वजनाचे मणी मंगळसूत्र व दोनशे रुपये रोख असा 62 हजारांचा एवज चोरला गेला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.शहरातील पंधरा दिवसातील ही तीसरी घटना आहे. त्यामुळे नागरिकांनीही गर्दीच्या ठिकाणी आपल्या किंमती ऐवजाची काळजी घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)