बस चालकाला मारहाण करणारे गजाआड

सातारा,दि.1(प्रतिनिधी)
जमखंडी ते मुबंई जाणाऱ्या बसच्या चालकाला मारहाण करणाऱ्या दोघांना सातारा तालुका पोलिसांनी गजाआड केले. सोमवारी दुपारी शेंद्रे गावच्या हद्दीत ओव्हरटेक करण्यावरून संजय राजाराम साळुंखे,सुजीत सुनिल शिवदास (दोघे रा. बोरगाव,ता.सातारा) यांनी कमरेच्या पट्ट्याने मारहाण केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या दोघांना अटक केली.

याप्रकरणी अभिजीत बचाराम कुंभार (रा.देहू रोड,पुणे) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. कुंभार हे मुंबई आगाराची एमएच 20 बीएल 3958 ही बस घेऊन कर्नाटकातील जमखंडी येथून मुबंईला निघाले होते. बस शेंद्रे गावच्या हद्दीत आल्यानंतर पाठीमागुन आलेल्या एमपी 04 एफक्‍यू 1102 या दुचाकीने बसला ओव्हरटेक केले.

त्यानंतर त्या दुचाकीवरील युवक हे बसला वारंवार अडथळे निर्माण रत होते. त्यावेळी बसचालकाने त्या युवकांना समजावुन सांगत असताना चिडलेल्या त्या दोघांनी बसचालक अभिजीत कुंभार यांना कमरेच्या पट्ट्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. या घटनेचे काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. यावेळी काही महामार्गावरील वाहतूक खोळंबल्याने जिल्हा वाहतूक पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. त्यानंतर मारहाण करणाऱ्या युवकांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात बसचालकाच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)