बस्ती येथे वाजपेयींच्या अस्थी विसर्जनावेळी बोट उलटली

बस्ती: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थी विसर्जनावेळी बोट उलटल्याची दुर्घटना उत्तर प्रदेशातील बस्ती येथे घडली. यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या बोटीत खासदार, आमदारांसह अनेक पोलीस अधिकारी होते.

बस्तीमधील कुओना नदीच्या घाटावर वाजपेयी यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी राज्यमंत्री सुरेश पासी, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. रमापाती राम त्रिपाठी, खासदार हरीश द्विवेदी, चार आमदार, पोलीस अधीक्षक दिलीप कुमार यांच्यासह अनेक लोक एकदमच बोटीत बसले. बोटीत क्षमतेपेक्षा अधिक जण बसल्याचे बोट अचानक उलटली. यामुळे बोटीतील सर्व जण नदीत पडले. सुरक्षासाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी तात्काळ सर्वांना सुरक्षित बाहेर काढले.

या घटनेनंतर तेथे एकच पळापळ सुरू झाली. पोलीस, सुरक्षारक्षक, भाजप कार्यकर्ते यांनी तात्काळ नदीत उडी मारून पाण्यात पडलेल्या सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर नदीच्या किनाऱ्यावरील घाटात जाऊन अस्थीचे विसर्जण केले, अशी माहिती पोलीस अधीक्षक दिलीप कुमार यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)