बस्ती में अपनी हिंदू-मुसलमां जो बस गये… इन्सान की शक्‍ल देखने को हम तरस गए..

मखदुम सोसायटीच्या गजल ग्रुपचा मदर डे निमित्त मुशायरा
नगर – देशभक्त, शहीदांचे बलिदान, राष्ट्रीय एकात्मता, जीवघेणी महागाई, हिंसाचारात निरापराधांचा मृत्यू, इन्सानियत मानवतेच्या विरोधात सूरु असलेल्या कारवाया आणि असंवेदनशिल राज्यकर्ते सामान्यांच्या मनात खदखदत असलेल्या अशा देश हिताच्या गंभीर विषयांवर देशाच्या विविध भागातील समस्यांवर नवोदित ग्रुप सभासदांनी मान्यवर कवींच्या कविता आपल्या प्रभावी आणि भेदक शैलीत सादर केल्या . रहेमत सुलतान सभागृहात उपस्थित रसिकांनीहि तितकीच दिलखुलास आणि अंत:करणपूर्वक दाद दिली. प्रसंग होता मातृदिनानिमित्त मखदुम सोसायटीच्या गजल ग्रुप आयोजित तमसिली मुशायऱ्याचे. वास्तववादी कवितांमुळे सभागृह अंतर्मुख होत होते.
यामुशायऱ्याच्या अध्यक्षस्थानी नगर महोत्सवचे संयोजक सुधीर मेहता होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक फय्याज शेख, कवयित्री डॉ.कमर सुरुर उपस्थित होते.
मैने हर रोज जमाने को रंग बदलते देखा है…उम्र के साथ जिंदगी को ढंग बदलते देखा है… ही समाजातील सत्य स्थिती श्रीकांत सोनटक्के यांनी मांडली. लगेगी आग तो आयेंगे घर कई जद्में… यहॉं पर सिर्फ हमारा मकान थोडी है…. सामुदायिक हिंसाचार व वैयक्तिक जीवन पद्धतीवर होणाऱ्या आक्रमणावर तारिक शेख यांनी ही अत्यंत ज्वलंत प्रश्‍नावर राहत इंदोरी यांची कविता सादर केली.
किसी ने हिंदू देखा, किसी ने मुसलमान देखा…. जो शहिद हो गये, उन्होंने बस हिंदूस्थान देखा….. या देशभक्तीवर धर्मनिरपेक्षा संदर्भात डॉ.शमा फारुकी यांनी सर्वांना अंतर्मुख करणारी कविता सादर करुन भरपूर दाद मिळविली. जावेद तांबोळी यांनी अब मेरा दिल कोई मजहब न मसिहा मांगे… ये तो बस प्यार से जिनेका सलिका मांगे….या कवितेतून माणुकीने जीवन जगण्याचे आवाहन केले.
फिक्र से आझाद थे और खुशियॉं इकठ्ठी होती थी…. वो भी क्‍या दिन थे, जब अपनीभी गर्मियों की छुट्टीयॉं होती थी… ही कविता जावेद मास्टर यांनी सादर करुन भुतकाळातील उन्हाळ्याच्या सुट्टयामधील आनंदाचे वर्णन केले. त्यानंतर सय्यद शफकत यांनी कविता सादर करतांना एक तौलियेसे पुरा घर नहाता था, दूध का नंबर बारी-बारी आता था… बडे भाई के कपडे छोटे होने का इंतराज रहता था, स्कूल में बडे भाई की ताकतसे छोटा रौब जमाता था… ही कविता सादर करुन सय्यद शफकत दाद वसूल केली.
ये अंधेरे देख ले मुँह तेरा काला हो गया… मॉं ने आँखे खोल दी घर में उजाला हो गया… मेरी ख्वॉईश है के मैं फिरसे फरिश्‍ता हो जॉंऊ… मॉं से इस तरह लिपट जॉंऊ के बच्चा हो जॉंऊ… हि आईवरील सुंदर कविता सादर करुन नईम सरदार यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. त्यानंतर आबीद दुलेखान यांनी बहलाकर छोड आते है वृद्धाश्रम में मॉं-बाप को… आजकल घर में पुराना सामान कौन रखता है…. या पंक्तीतून वृद्धांश्रमांच्या वाढत्या संख्यांवरुन वृद्धांच्या प्रश्‍नांना वाचा फोडली.
गिल्ली डंडे, पतंगे, कंचे, कॅरम, ताश, लट्टू…. सब हाथों में डंडा लिये पुछ रहे है साला ये मोबाईल कहा मिलेंगा ही कविता सादर करुन बालपणांतील खेळ हिरावून घेणाऱ्या मोबाईल वरील भाष्याने सर्वांना विचार करायला लावले. ऍड. मन्सूर जहागिरदार यांनी जो वालिद की कद्र करे वो कभी गरीब नही होता…. जिस ने मॉं की कद्र कर ली वो कभी बदनसिब नही होता…. ही कविता सादर करुन आई-वडिलांविषयीचा सेवाभाव जागृती केला.
कटा जब शिश सैनिक का तो हम खामोश रहेते है… कटा एक सीन पिक्‍चर का तो सारे बोल जाते है.. ही कविता इंजि. दिलीप पांढरे यांनी सादर करुन सोशल मिडयाच्या माध्यमातून घडणाऱ्या परिस्थितीवर बोट ठेवले.
तमसिली मुशायऱ्याचे उत्तमरित्या सूत्रसंचालन करणाऱ्या कवयित्री डॉ.कमर सुरुर यांनी कविता सादर करतांना हिंदू धर्मसे नफरत, ये कुराण नही कहेता… भारत की मस्ज़दे तोडे, ये श्रीराम नही कहते… रोटी का कोई धर्म नही होता…. पाणी की कोई जात नही होती… जहॉं इन्सानियत जिंदा है वहां मजहब की बात नही होती…. किसी को लगता हिंदू खतरे में है, किसी को लगता मुसलमॉं खतरे में है… धर्म का चष्मा उतारकर देखो यारो…. पता चलेगा की नेताओं के कारण हमारा हिंदूस्थान खतरमें है…. ही कविता सादर करुन सध्याच्या सामजिक एकतेस बाधक असणाऱ्या गोष्टींवर टिप्पणी केली.
सहेमी हुई है झोपडी पाणी के खोंफसे… महेलों की आरजू है की बरसात तेज हो… ही कविता मनुवर हुसेन यांनी सादर करुन गरीब-श्रीमंत यांच्यातील विचार सरणीचा पावसाचा संदर्भ देऊन कविता सादर केली. जब हमे बोलना भी नही आता था, तबभी हमारी हर एक बात समझ जाती थी मॉं.. जब हम बोलना सिख गये, तो बात बात पर बोलते है, छोडो आप नही समझोगी मॉं… ही कविता सादर करुन नवीन पिढीच्या मानसिकतेचे दर्शन कवितेच्या माध्यमातून मदीहा सय्यद यांनी मांडले.
राजूभाई शेख यांनी आपली कविता सादर करतांना सामाजिक एकोप्याचे दर्शन घडून आणणारी हुई आजाने मगरिब की, आवाजें घर में जाती थी… पंडित के घर की भी औरत तभी दिया जलाती थी… कल हम पंडित के लोटे सें वजू बनया करते थे… मंदिर में जाकर प्रसाद चुराया करते थे.. ही कविता सादर करुन मुशायऱ्याचा समारोप केला.
प्रस्ताविक करतांना मुशायरयाचे अध्यक्ष सुधीर मेहता म्हणाले की, सर्व समाज मनापासून एक व्हावा. हा उद्देश कार्यक्रमांतुन सफल झाला. हा खऱ्या अर्थाने सामाजिक धार्मिक ऐक्‍याच्या कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)