बसेस खरेदीवरून जुंपली

महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांचा कलगीतुरा

पुणे – पीएमपीएमएलसाठी खरेदी करण्याच्या चारशे सीएनजी, बीआरटी आणि नॉन एसी बसेस पैकी महापालिकेच्या हिश्‍श्‍याच्या 240 बसेससाठी आवश्‍यक असलेल्या 116 कोटी 17 लाख 9 हजार 200 रुपये महामंडळाकडे टप्प्याटप्प्याने वर्ग करण्याच्या प्रस्तावाला महापालिका मुख्यसभेत बुधवारी मंजुरी देण्यात आली. मात्र, यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील शाब्दिक चकमक सभागृहात पहायला मिळाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही रक्‍कम उभी करणे आणि पुढील 2019-20 या आर्थिक वर्षांत उर्वरीत रक्‍कम उपलब्ध करून देणे असा हा प्रस्ताव होता. हे पैसे कसे द्यावे लागणार याविषयी पीएमपीएमएलचे प्रमुख अभियंता सुनील बोरसे यांनी सभागृहात माहिती दिली. तसेच सीएनजी बस खरेदी करणार तर सीएनजी पंप पुरेसे आहेत का, इलेक्‍ट्रिक बस कमी का घेणार, आचारसंहिता लागू होणार असल्याने बस खरेदी कशी करणार, येथपासून ते बस खरेदीतच राफेल सारखा घोटाळा नाही ना, असे उपरोधिक प्रश्‍न आणि शंका सदस्यांनी सभागृहात उपस्थित केल्या.

पीएमपीएमएलचे अध्यक्ष या नात्याने सिद्धार्थ शिरोळे यांनी विरोधकांच्या प्रश्‍नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. काही बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने आणि काही प्रक्रिया मार्चमध्ये पूर्ण होणार असल्याने ती आचारसंहितेत अडकणार नाही असे त्यांनी सांगितले. तसेच इलेक्‍ट्रिक बस फायद्याच्या आहेत तर त्या जास्त खरेदी का करणार नाही, तसेच केंद्र आणि राज्याकडून अनुदान का आणले नाही, याबाबत चेतन तुपे यांनी प्रश्‍न उपस्थित केले.

इलेक्‍ट्रिक बसची पूर्णपणे चाचणी झाली नाही. त्यामुळे त्याचा “रिझल्ट’ अद्याप आपल्याला नाही. त्यामुळे या बसेस खरेदी करण्याची रिस्क घेण्यापेक्षा त्या भाड्याने घेण्यात येणार आहेत, असे शिरोळे म्हणाले. तसेच बसपार्किंगबाबत बोलताना महापौरांनी स्वत: पीएमपीएमएलचे संचालक म्हणून सभागृहात माहिती दिली. त्या म्हणाल्या, महापालिकेने डेपोंना ज्या जागा दिल्या आहेत, त्या विकसित करण्यात येत आहेत. त्यानंतर तेथे डेपोसाठी जागा उपलब्ध होईल.

बसच्या स्थितीविषयी वैशाली बनकर यांनी प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर महापौरांनी बस सुस्थितीत असल्या पाहिजेत अशा सूचना डेपो मॅनेजर्सना द्या. आपण स्वत: व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांना याबाबत पत्र लिहू, असे महापौरांनी सभागृहात सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)