बसस्थानक नजीकचे एटीएम फोडले

कोपर्डे : बसस्थाननजीकचे चोरट्यांनी फोडलेले एटीएम मशीन.

संशयित चोराला युवकांनी पकडले

कोपर्डे हवेली, दि. 29 (वार्ताहर) – येथील काही दिवसांपूर्वी चोरीची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री एकच्या दरम्यान एसटी स्टॅण्ड नजीकचे एटीएम चोरट्यांनी फोडले. वडोली निळेश्वर रस्त्यानजीक असणार्‍या नवीन पाण्याच्या टाकीजवळ पहाटे तीनच्या दरम्यान एका संशयित चोरट्याला पकडण्यात यश आले तर तिघजण पळून गेले.
याच रात्री पार्ले गावामध्ये दोन ते अडीचच्या सुमारास चारजण संशयितरित्या फिरताना ग्रामस्थांना आढळून आले. परंतु ऊस तोड कामगार समजून त्याकडे दुर्लक्ष केले. त्याठिकाणी चोरट्यांच्या हाताला काही न लागल्यामुळे ते परत कोपर्डे हवेली येथे आले असण्याची शक्यता आहे. पार्ले व कोपर्डे हवेली दरम्यान चे अंतर दोन किलोमीटर आहे. यासाठी त्यांनी दुचाकीचा वापर केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुन्हा कोपर्डेत आल्यानंतर एका घराजवळील झाडावर चढून टेहळणी करत होते ते काही युवकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर युवकांनी इतर युवकांशी संपर्क साधून एकत्र येवून चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातील तिघेजण पळून गेले व एकाला पकडण्यात युवकांना यश आले. पकडलेल्या चोरट्याला काही न करता मारुतीच्या मंदिरात कोंडून ठेवले व पोलिसांशी संपर्क साधला. चोरट्याला पकडल्यानंतर युवकांनी त्याला नाव, गाव व इतर साथीदारांबद्दल विचारले असता मी फक्त पोलिसांनाच सांगणार असे तो बोलत होता. सकाळी 9 वाजता पोलिसांनी संशयित चोरट्याला ताब्यात घेतले.
पंधरा ते वीस दिवसांपूर्वी गावांमध्ये काही अज्ञात चोरट्यांनी शिवाजी साळवे यांच्या घरातून साडे तेरा तोळे सोने लंपास केले होते. त्या घटनेपासून लोक सावध झाले होते. गावातील लोकांनी दक्षता घेतल्यामुळेच संशयित चोरट्याला पकडण्यात यश आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)