बसप्रवासात ऐवज चोरी

पिंपरी, (प्रतिनिधी) – बसप्रवासादरम्यान खिशातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम अस एकूण 2 लाख 73 हजार 850 रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला. ही घटना डांगे चौक ते शिवाजीनगर बस प्रवासादरम्यान सोमवारी (दि.29) सकाळी साडे दहा ते दुपारी बारच्या दरम्यान घडली. हर्षल साखरे (वय 35, रा. थेरगाव) यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अनोळखी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षल यांचे वडील भरत साखरे हे बसमधून प्रवास करत असताना, चोरट्याने गर्दीचा गैरफायदा घेत, त्यांची नजर चुकवून खिशातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख 18 हजार 850 रुपये असा एकूण 2 लाख 73 हजार 850 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. वाकड पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)