बसपसाठी काही जागा त्यागण्यास सप तयार

अखिलेश यादव : भाजपचा पराभव हेच उद्दिष्ट
लखनौ – भाजपचा पराभव हेच आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे वेळ आलीच तर बसपसाठी काही जागा त्यागण्यास आम्ही तयार आहोत, असे उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

सप आणि बसपमधील समझोता भाजपला डाचत आहे. आमचा समझोता पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही कायम राहील, अशी ग्वाही अखिलेश यांनी दिली. उत्तरप्रदेशमध्ये मागील लोकसभा निवडणुकीत आणि वर्षभरापूूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन केले. मात्र, मागील काही काळात त्या राज्यातील पोटनिवडणुकांत भाजपची पीछेहाट झाली. सप आणि बसप एकत्र आल्याने ते घडले. मात्र, दोन्ही पक्षांमधील समझोता फार काळ टिकणार नाही, अशी भूमिका सातत्याने भाजपकडून मांडली जात आहे. त्यातच पुढील लोकसभा निवडणुकीला आता वर्षभराचाही कालावधी उरलेला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापार्श्‍वभूमीवर, अखिलेश यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व आहे. भाजपच्या विरोधात राजकीय संघर्ष करण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याच्या हालचाली राष्ट्रीय स्तरावर सुरू आहेत. या हालचालींना अनुकूल अशीच भूमिका सध्या तरी सपने घेतल्याचे दिसते. मात्र, बसपकडून सावधगिरीने पाऊले उचलली जात आहेत. जागावाटपात आदराची वागणूक मिळाली तरच विरोधी आघाडीचा भाग बनू, असे बसपच्या प्रमुख मायावती यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)