बसपच्या गटात सपची सायकल

गटनोंदणी चारहून पाचपर्यंत झाली : महापालिकेत राजकीय वजन वाढले

नगर  – बहुजन समाज पक्षाच्या चार नगरसेवकांच्या गटनोंदणीत समाजवादी पक्षाचे नगरसेवक सामील झाले आहे. या नोंदणीनंतर हत्तीबरोबर सायकल आल्याची प्रतिक्रया महापालिकेच्या राजकीय वर्तुळात उमटू लागल्या आहेत. सपचे मीर आसिफ सुलतान हे बसपच्या गटात सहभागी झाले आहेत. पाच जणांची ही गटनोंदणी बुधवारी नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे केली आहे. बसपचे गटनेता मुदस्सर शेख यांनी या माहितीला दुजोरा दिला.

महापालिका निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. हे चारही नगरसेवक निवडणुकीत जिंकले. शिवसेनेला 24, राष्ट्रवादी 18, भाजपचे 14, कॉंग्रेसचे पाच, अपक्ष दोन व एक समाजवादी पक्षाचा उमेदवार निवडून आला होता. शिवसेनेने 24 जणांची, राष्ट्रवादीने एका अपक्षाला बरोबर घेत 19 जणांची, भाजपने 14 जणांची, कॉंग्रेसने पाच जणांची गटनोंदणी केली होती. सपचे मीर असीफ सुलतान आणि अपक्ष श्रीपाद छिंदम हे कोणत्याही गटनोंदणीत सहभागी झाले नव्हते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तीस दिवसात गटनोंदणी करणे हे कायद्याने अनिवार्य होते. ती मुदत काल संपत होती. ते लक्षात घेऊन बसपने सपचे मीर आसीफ सुलताना यांना बरोबर घेत पाच जणांनी गटनोंदणी केली. बसप, सप आणि अपक्ष विकास आघाडी अशा नावाने ही गटनोंदणी केली आहे. बसपचे सपचा एक वाढल्याने मनपात वजन वाढले आहे. या जोरावर महापालिकेत कोणत्या पदावर दावा ठोकतात, याकडे राजकीय धुरांचे लक्ष लागले आहे. भाजपने महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीला समोरे जाताना बसपला खुर्चीचा शब्द दिलेला आहे. बसपचे सपमुळे वजन वाढल्याने, आता राजकीय गणिते वाढणार असेच चित्र पुढे पाहायला मिळणार आहे

हत्तीची तिरकी चाल सत्तेसाठी…

महापालिका निवडणुकीत शिवसेने बसपच्या विरोधात उमेदवार दिले नव्हते. त्याचा फायदा बसपच्या उमेदवारांना झाला. सत्तेस्थापनेसाठी शब्द यामागचे कारण होते. बसपने शिवसेना दिलेला शब्द पाळला. सत्तेस्थापनेच्या बाजूनेच असलेला हा शब्द बसपने शिवसेनेऐवजी भाजपच्या बाजूने खरा केला. हत्तीची ही तिरकी त्याचे किंगमेकर सचिन जाधव यांनी खेळल्याचे बोलले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)