लखनौ – उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांमध्ये विविध पक्षांशी आघाडी करण्याच्या दृष्टीने बसपची चर्चा सुरू आहे. मात्र, कुठल्याही स्थितीसाठी आपण तयार रहायला हवे. प्रसंगी आपण स्वबळावरही लढण्याची तयारी ठेवायला हवी, असे बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी आज म्हटले.

मायावती येथे बसपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होत्या. कुठलीही निवडणूक लढवताना जागावाटपात आदराची वागणूूक मिळावी अशी बसपची भूमिका आहे. अन्यथा, स्वबळावर लढण्याचा पर्यायच चांगला ठरेल, असे त्या म्हणाल्या. या वक्तव्यातून त्यांनी प्रामुख्याने समाजवादी पक्षाला (सप) इशारा दिल्याचे मानले जात आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशात झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत सप आणि बसपने हातमिळवणी केली. त्यानंतर हे पक्ष पुढील निवडणुकांतही एकत्र येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मायावती यांनी बसपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही फेरबदल केले. त्याचा संदर्भ देऊन त्यांनी आणखी 20 ते 22 वर्षे मीच पक्षाचे नेतृत्व करेन. त्यामुळे कुणी बसपचे अध्यक्ष बनण्याचे स्वप्न पाहू नये, असे म्हटले.

भाजपकडून लोकसभा निवडणुका मुदतीआधीच घेण्याचा प्रयत्न होईल, या शक्‍यतेचाही त्यांनी यावेळी पुनरूच्चार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)