बसथांब्यावरुन महिलेस लुटले

पुणे – बसथांब्यावर बसची वाट पाहात असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या हाताला गुंगीच्या औषधाचा वास देऊन चोरट्यांनी त्यांच्याकडील साठ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. 15 जून रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बंडगार्डन बसथांब्याजवळ ही घटना घडली. विमल बरके ( वय 61, रा. सोमवार पेठ) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरके या 15 जून रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बंडगार्डन बसथांब्यावर बसची वाट पाहात बसल्या होत्या. त्यावेळी दोघेजण तेथे आले, त्यांनी बरके यांच्या हाताला धातूची वस्तू लावली. त्यामुळे त्यांना चक्कर आली, त्यानंतर त्यांचे गळयातील साठ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने या चोरट्यांनी लांबविले. सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. एम. नम अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)