बसच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

पिंपरी – कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसची धडक बसल्याने पादचारी तरूण मृत्युमुखी पडला. ही घटना भोसरी येथे घडली.

दीपक प्रभू खळगे (वय-32, रा. लोंढे बिल्डींग, शिवगणेश कॉलनी, धावडेवस्ती, भोसरी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी दीपकचा भाऊ सचिन (वय 28) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

11 सप्टेंबर रोजी दीपक हा घरासमोरील मोकळ्या जागेतून चालला होता. यावेळी कामगारांची ने-आण करणाऱ्या एका सफेद रंगाच्या बसची त्याला जोरदार धडक बसली. यात दीपकचा मृत्यू झाला. अपघातानंतर बस चालक बससहित पसार झाला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)