बसचालकाला मारहाण करून लुटले

पुणे – खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या टोलनाक्‍यावर टोल देण्यासाठी थांबलेल्या खासगी बसचालकाला मारहाण करून तीन चोरट्यांनी त्याच्याकडील पाचशे रुपयांची रोख रक्‍कम लुटुन नेली. ही घटना 29 जानेवारी रोजी जुन्या पुणे-मुंबई हायवे वरील खडकी रेल्वे स्थानकाच्या समोर असलेल्या टोल नाक्‍यावर मध्यरात्री सव्वाएक वाजण्याच्या सुमारास घडली. खडकी पोलिसांनी याप्रकरणी तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ते पसार झाले आहेत.

देवराम जाट (30, रा. नाशिक) यांनी यासंदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाट हे एका खासगी बसवर चालक म्हणून काम पाहातात. ते ही बस घेऊन नाशिकला निघाले असताना खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या टोल नाक्‍यावर टोल देण्यासाठी ते थांबले होते. त्यावेळी आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील पाचशे रुपयांची रोकड लुटुन नेली. पोलीस उपनिरीक्षक मदन कांबळे अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)