बसचालकाची दोन वाहनांसह तीन दुकानांना धडक

वाकी-पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चिंबळी फाट्याजवळ (ता. खेड) बेफाम स्कूल बस रस्त्याच्या दहा फूट बाजूला जाऊन एक मालवाहू टाटा एस, आईस्क्रिम ठेला, दुचाकी, लहान हॉटेल आणि भंगाराच्या दुकानाला जोरजोरात ठोकरले. या घटनेत दोघांना गंभीर दुखापत झाली असून, काही व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सुदैवाने या स्कूलबसमध्ये कुणीही विद्यार्थी नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर बसचालक फरारी झाला आहे. संबंधित बसचा ब्रेक निकामी झाला होता की बस चालकाने मद्यपान केले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघातात जखमी झालेल्यांपैकी एकाचे नाव गुजर, तर दुसऱ्याचे जेचके (पूर्ण नावे निष्पन्न नाहीत) असे असल्याचे समजते. चाकण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती. स्कूल बसचालक मोशीहून चाकण बाजूकडे येत असताना इंद्रायणी नदीवरील पूल ओलांडून पुढे आल्यानंतर रस्त्यापासून डाव्या बाजूला पंधरा ते वीस फूट अंतरावर चारीत शिरला. प्रथम एक मालवाहू लहान टेम्पो, त्यानंतर जवळच असलेला आईस्क्रीम ठेला, एक लहान हॉटेल आणि त्यासमोरील दुचाकी यांना एकापाठोपाठ धडका देत जवळच्या भंगाराच्या दुकानात शिरल्यानंतर ही बस थांबली. आईस्क्रीमच्या ठेल्याचा मालक आणि एक नागरिक या अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर येथील एका खाजगी रुग्णालयात तातडीचे उपचार सुरु आहेत. दरम्यान, भरधाव बस चालकाचा वेग पाहूनच रस्त्यातील लोकांना धडकी भरली होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. चाकण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)