बवाना पोटनिवडणूक ‘आप’ने एकतर्फी जिंकली

केजरीवालांना बऱ्याच दिवसांनी मिळाला दिलासा

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेच्या बवान मतदार संघात झालेली पोटनिवडणूक आम आदमी पक्षाने एकतर्फीपणे जिंकली आहे. या निवडणूकीत पक्षाने भाजपच्या उमेदवाराचा तब्बल 24 हजार मतांनी पराभव केला. येथे याही वेळेला कॉंग्रेसचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिला.

आम आदमी पक्षाचे यापुर्वीचे आमदार वेदप्रकाश यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने येथे पोटनिवडणूक घ्यावी लागली. यावेळी भारतीय जनता पक्षाने वेदप्रकाश यांना उमेदवारी दिली होती तर आम आदमी पक्षाने त्यांच्या विरोधात राम चंदर यांना उमेदवारी दिली होती. ही निवडणूक चुरशीची होईल असे वाटले होते पण ती एकतर्फी झाली आणि आम आदमी पक्षाने 24 हजार मतांच्या मताधिक्‍याने हा विजय मिळवला.

या वर्षीच मार्च महिन्यात झालेल्या महापालिकांच्या निवडणूकांमध्ये आम आदमी पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. दिल्लीतील तिन्ही महापालिका आपल्याकडेच कायम राखण्यात भाजपला यश आले होते. या निवडणुकीच्या काळातच वेदप्रकाश यांनी आम आदमी पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप मध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या पोटनिवडणुकीला महत्व होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)