बळीराजा चिंतातूर!

  • कृषी : यंदा रासायनिक खतांच्या किंमती 40 टक्‍क्‍यांनी वाढल्या
  • वाढत्या किंमतींमुळे शेतमालाच्या उत्पादन खर्च वाढला

कामशेत – मागील वर्षीच्या तुलनेत रासायनिक खते नियमित वापरातील खतांच्या किमती 40 टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. वाढत्या खतांच्या किंमतींमुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

मावळात भात पीक काढल्यानंतर शेतकरी गहू, काकडी, वांगी, कांदा, मिरची, वेगवेगळ्या प्रकारची फुले, पालेभाज्या व भुईमूग यांसारख्या तेलबियांची देखील पीके घेत असतात. मात्र ही पिके घेण्यासाठी लागणाऱ्या खतांच्या किंमती मागील वर्षांच्या तुलनेत युरिया या खता व्यतिरिक्‍त सर्वच खतांच्या किमतीत 35 ते 40 टक्‍क्‍यांनी भरमसाठ वाढ झाली. वाढत्या किंमतींमुळे शेतमालाच्या उत्पादन खर्चात देखील वाढ होणार आहे. पण खतांच्या वाढीव किंमतीच्या तुलनेत शेतमालाच्या किंमती वाढल्या आहे. या वाढीव खर्चाचा अतिरिक्‍त ताण शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहेत.
शेतात उत्पादित होणाऱ्या शेतमालाच्या किंमती स्थिर असताना खतांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने शेतकरी अडचणीत येत आहे. त्यामुळे शेतमालाच्या किंमती वाढल्या नसल्याने शासन खतांच्या किंमती कोणत्या आधारे वाढविले, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

रासायनिक खते ही प्रामुख्याने विदेशातून आयात केली जातात. ही खते निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याचे बोलले जाते आहे; तसेच शासन आता रासायनिक खतांवर न्युट्रीयन बेस सबसिडी देत असल्याने खतनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना किंमती ठरविण्याची मुभा दिल्याने देखील त्यांनी किंमती वाढविल्या असल्याची चर्चा आहे.

मागील वर्षी डी. ए. पी. ची 50 किलोची बॅग 1080 रुपयांना होती.
यावर्षी ती 1445 रुपयांना झाली आहे.
तर 10:26: 26 मागील वर्षी 1020 आता 1395 रुपये.
महाधन गतवर्षी 1000 रुपये यंदा 1360 रुपये.
18:18:10 कृषीउद्योग मागील वर्षी 835 यावर्षी 980 रुपये.
15:15:0 मागील वर्षी 880 यंदा 1032.
20:20:0 गतवर्षी 957 यावर्षी 1050

या खतांच्या दरात जरी वाढ झाली असली तरी सेंद्रीय खतांच्या किंमती मात्र मागील वर्षी प्रमाणेच स्थिर आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत आदी खते वापरून उत्पादन खर्च कमी करावा लागणार आहे.
रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांना पुन्हा पारंपरिक खते वापरून शाश्‍वत शेतीकडे वळावे लागणार आहे. पण या साठी त्यांना शेंद्रीय शेती नियोजन याविषयीचे मार्गदर्शन मिळणे महत्वाचे आहे. शेतकऱ्यांना यासाठी कृषी विभागाने गावोगावी जाऊन याविषयी मार्गदर्शन व पिकांचे नियोजन व खतांचा वापर याविषयीची कार्यशाळा आयोजित करणे आवश्‍यक आहे. या काळात कृषी विभाग कशा प्रकारे कामगिरी बजावणार, यावर शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

रासायनिक खते उत्पादन आणि वापर करणाऱ्या देशातील क्रमवारीत भारताचा 3 क्रमांक आहे आणि त्यातील बहुतांशी रासायनिक खते हि बागायती पिके व फळझाडांसाठी वापरली जातात, त्यात महाराष्ट्रात 82 टक्के जमिनीह्या जिरायती असल्याने त्यात रासायनिक खतांच्या वापराचे प्रमाण कमी आहे.
– डॉ. चंद्रशेखर क्षीरसागर, भात संशोधन केंद्र प्रमुख, लोणावळा.

शासनाकडून युरिया खतासाठी अनुदान दिले जाते, इतर रासायनिक खतांवर न्युट्रीयन बेस सबसिडी दिली जाते, यामुळे कंपन्या स्वतः खतांच्या किंमती ठरवितात. खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढल्याने खतांच्या किंमतीत वाढ झाली आहे .
– संताजी जाधव, कृषी अधिकारी, पंचायत समिती, मावळ.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)