बळीराजाला सुखी ठेव, दुष्काळी भागात पाऊस पडू दे !!

मुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे


वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना

मुंबई – राज्यातील बळीराजाला सुखी ठेव, राज्यातील दुष्काळी भागात चांगला पाऊस पडू दे आणि नागरिकांना सुखसमाधान मिळू दे…, सर्वांना चांगले आरोग्य लाभो… असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाला घातले. वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी आज त्यांनी सपत्नीक श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली.

लोकमान्य टिळकांनी जात, धर्म, भाषा, पंथ यापलीकडे जाऊन लोकांनी संघटित व्हावे या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. सामाजिक अभिसरणासाठी त्यांनी सुरु केलेले पर्व अव्याहत सुरु आहे. या उत्सवातून समाज अधिक एकसंघ होऊ दे, अशी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पदूम मंत्री महादेव जानकर, कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विद्या ठाकूर, आमदार विनायक मेटे, तारासिंग, भारती लव्हेकर, राज पुरोहीत, आशिष शेलार आदींनी वर्षा निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)