बळीराजाला नक्षत्रांचं देणं

निवास सुतार

काय आहे नक्षत्र?

पृथ्वीचा ध्रुव सरळ नसल्यामुळे सुर्याच्या व चंद्राच्या उगवण्याच्या व मावळण्याच्या मार्गामध्ये दररोज बदल होत असतो. पृथ्वी स्थिर आहे असे मानल्यास सूर्य, चंद्र, आणि इतर ग्रहांसोबत सर्व तारे पृथ्वीभोवती गोलाकार भ्रमण करीत असल्याचे जाणवते. सूर्य आणि चंद्राच्या दररोजच्या उगवण्याच्या व मावळण्याच्या मार्गास आयनिक वृत्त असे म्हटले जाते. आयनिक वृत्ताचे प्रमुख भाग असुन, त्यांना राशी असे म्हटले जाते. आयनिक वृत्ताचे आणखी भाग पडून त्यांना नक्षत्र हे नाव देण्यात आले आहे.

21 व्या शतकात मानव आधुनिकतेच्या जोरावर चंद्रावर पोहोचला,म्हणजे अगदी दुसऱ्या जगातच…आपण ज्याचं पृथ्वीतलावरुन अनुमान लावत आलो आहोत त्या ढगाच्या पोटात होणारी क्रिया -प्रक्रिया ही त्यामुळे आपल्याला समजलेली आहे.एकीकडे अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध असताना, दुसरीकडे मात्र आपल्या कृषिप्रधान देशातील बळीराजा हवामान खात्याने दिलेला पावसाचा अंदाज खरा मानत नाही.उलट पारंपारिक पद्धतीने सांगितल्या जाणाऱ्या पंचागातील नक्षत्रानं दिलेला पावसाचा सांगावा तो शिरसावंद्य मानतो.

असं का …..? तर हवामान खात्याचे अंदाज टक्‍यांपूरते मर्यादित असतात.शिवाय ठराविक कालावधीपर्यतचाच तो अंदाज असतो.मात्र, नक्षत्रातील वाहन त्यांना पुढच्या अनेक दिवसांपर्यतचे अनुमान देत असते, अशी इथल्या बळीराजाची धारणा आहे.

ग्रामीण भागात गुढीपाडव्याच्या दिवशी गावच्या पारावर किंवा चावडीवर पंचांगाचं वाचन होत असते.या पंचागात दिलेल्या नक्षत्रावरुन यंदाच वर्ष पाऊसपाण्याच्या दृष्टीने कसं आहे याचा धांडोळा घेतला जातो.त्यामुळेच की काय, यंदा किती टक्के पाऊस पडेल यापेक्षा यंदा बेडकं डराव डराव करतील का,हे त्याला जास्त उमगतं अन त्यावरुनच तो शेतात कधी आणि काय पेरायचं याचं गणित मांडत असतो या सगळ्यांला वैज्ञानिक आधार नसला तरी पिढ्यानपिढ्या जोपासल्या जाणाऱ्या विश्‍वासार्हतेवर ही पध्दत आजही टिकून आहे.त्यामुळेच की कायं राज्यातल्या प्रत्येक खेड्यांमध्ये शेतशिवाराची आखणी करणारं हे कृषीशास्त्र 21 व्या शतकातही अखंडितपणे सुरु आहे.

रोहीणी,मृग,आर्द्रा नक्षत्र, पुनर्वसु (तरणा पाऊस), पुष्य (म्हातारा पाऊस),अश्‍लेषा(अवकाळीचा पाऊस) मघा (सासूचा पाऊस),पुर्वा फाल्गुनी(सुनांचा पाऊस)उत्तरा फाल्गुनी (रब्बीचा पाऊस), हस्त (हादगा),चित्रा (आंधळीचा पाऊस),स्वाती (अडवली – बडवली पाऊस) अशा बारा नक्षत्रांचा समावेश होतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)