बलिदान देणाऱ्या मराठा बांधवांच काय?

संग्रहित छायाचित्र

शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

पिडीत कुटुंबांना शासनाकडून मदतीची गरज

बिजवडी – सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी समाजाच्यावतीने राज्यभर लाखोंच्या संख्येने 58 ऐतिहासिक मूकमोर्चे, आंदोलने काढण्यात आली. या दरम्यान 40 समाज बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान दिले, तेव्हा कुठे आरक्षण मंजूर झाले आहे.

बलिदान देणाऱ्या युवकांचे कुटुंबीय संकटात आहेत. त्यांना शासनाकडून मिळावी, अशी मागणी श्रावणी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक संदीपशेठ घोरपडे यांनी केली आहे. दहिवडी, ता. माण येथे कार्यालयासमोर मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल पेढे वाटप करण्यात आले.

यावेळी कोपर्डीच्या ताईला व बलिदान दिलेल्या समाजबांधवांना आदरांजली वाहण्यात आली. मराठा समाजबांधव मोठ्य संख्येने उपस्थित होते. घोरपडे म्हणाले, सोशिक मराठा समाज हा वर्षानुवर्षे आरक्षणाची धग सहन करत आला आहे. आरक्षण नसल्याने हा समाज अनेक वर्षापासून आर्थिक, शैक्षणिक आघाड्यांवर पिछाडीवर पडला होता. त्यामुळे आरक्षणाची नितांत गरज होती.

यासाठी मराठा समाजाने आरक्षणासाठी राज्यभर ऐतिहासिक आंदोलने केली. या दरम्यान अनेक मराठा समाज बांधवांनी बलिदान दिले. शासनाने या समाजाचा उद्रेक पाहून आरक्षणाच्या मागणीची दखल घेत 16 टक्के आरक्षण दिल्यामुळे समाजाला सामाजिक न्याय मिळाला आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व नोकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे. या निर्णयाबद्दल या शासनाचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. मात्र, आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या समाजबांधवांच काय असा प्रश्‍न सर्वासमोर पडत आहे.

कुटूंबाचा आधारस्तंभ असलेली व्यक्ती आरक्षणासाठीच्या लढ्यात आपल्याला सोडून गेली याचे दु:ख त्यांना आहे. शासनाने या पिडीत कुटूंबियांचीही दखल घेणे गरजेचे आहे. बलिदान देणाऱ्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्याबरोबरच त्या कुटूंबातील होतकरू मुलांना नोकरी मिळवून द्यावी, अशी मागणीही घोररडे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)