बलात्कार प्रकरणी बाबा आशू भाई गुरुजी फरार

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली – बलात्कार प्रकरणातील आरोपी बाबा आशू भाई गुरुजी फरार झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलीसांनी आणखी एका बाबाचे काळे धंदे उघड केले आहेत. स्वत:ला ज्योतिषाचार्य म्हणवून घेणाऱ्या या बाबाच्या विरोधात एका पीडित महिलेने फिर्याद दाखल केली आहे. या बाबाने आणि त्याच्या मुलानेही उपचाराच्या निमित्ताने आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याची तक्रार तिने पोलीसात केली.

तक्रारीची कुणकुण लागताच बाबा आशू भाई गुरुजी आश्रम सोडून फरार झाला आहे. दिल्लीच्या अत्यंत पॉश हौजखास भागात त्याचा आश्रम आहे, आश्रमाच्या तपासणीत मिळालेल्या मतदाता ओळ्ख पत्रावर आशू भाई गुरुजीचा फोटो आहे, पण नाव मात्र आसिफ आहे. त्यामुळे नाव बदलून तो आपला उद्योग करत असल्याचा निष्क़र्ष पोलीसांनी काढला आहे. आपल्याप्रमाणे अनेक महिलांवर आशू भाई गुरुजींनी बलात्कार केले असावेत, पण लोकलज्जेमुळे कोणी पुढे येत नाही असे या महिलेने सांगितले. 1990 साली ज्योतिषाचा धंदा सुरू केलेला बाबा आशू भाई गुरुजी आज कोट्यधीश बनला आहे. राजनेता, अभिनेता आणि पोलीस अधिकारीही त्याच्याकडे सल्ल्यासाठी जात असत.

9 सप्टेंबर रोजी फरार झालेल्या बाबा आशू भाई गुरुजीच्या पोलीस शोधात असून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)