बलात्कार प्रकरणात आसाराम बापू दोषी

जोधपूर : अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी तुरुंगात असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला बुधवारी जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी आसाराम बापूसह शिल्पी आणि शरदचंद्र या दोन आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर शिवा, प्रकाश या अन्य दोन आरोपींना निर्दोषमुक्त केले आहे.

नेमक काय आहे प्रकरण 

मूळची उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील असलेल्या आणि आसाराम याच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूर नजीकच्या मनाई भागातील आश्रमात बोलावून १५ ऑगस्ट २०१३ च्या रात्री आपल्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप होता.

दरम्यान, आसाराम बापूवर भारतीय दंडविधान कलम 342, 376, 354-अ, 506, 509/34, जेजे ऍक्‍ट 23 आणि पोक्‍सो कायद्याच्या कलम 8 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर जोधपूर पोलिसांनी आसाराम बापूला इंदूरमधून 31 ऑगस्ट 2013 रोजी अटक केली होती. तेव्हापासून आसाराम बापू जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
10 :thumbsup:
3 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)