बलात्कार पीडित मुलीला गर्भपातास कोर्टाची मुभा

मुंबई – बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या मानसीक आरोग्यावर होणारा परिणाम आणि गर्भधारणा कायम ठेवल्यास त्या मुलीच्या जिवीताला होणारा धोक लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने 21 आठवड्याचा मुलीला गर्भपात करण्याची परवानगी दिली.

केईएम रुग्णालयाच्या डॉक्‍टरांच्या पथकाने बलात्कार पीडितेची वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर केल्यानंतर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठाने ही परवानगी दिली.

21 आठवड्याची गर्भवती असलेल्या या पिडीत मुलीने सोनोग्राफी अहवालानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमारे आज सुनावणी झाली. न्यायालयाने केईएम रुग्णालयाच्या डॉक्‍टरांच्या पथकाला त्या मुलीची तातडीने तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार डॉ. सामंत यांनी डॉक्‍टरांच्या पथकाचा अहवाल न्यायालयात सादर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)