बलात्कार, खून, भ्रष्टाचार प्रकरणातील कैद्यांना सरकारी योजनेत माफी नाही

नवी दिल्ली – बलात्कार, खून, भ्रष्टाचार प्रकरणातील राजकारण्यांसह दोषी कैद्यांना सरकारी शिक्षा माफी योजनेनुसार शिक्षा माफी मिळणार नाही. महात्मा गांधी यांची 150 जयंती वर्षभर साजरी करण्यात येणार आहे. तिचा एक भाग म्हणून देशभरातील तुरुंगात असणाऱ्या पात्र कैद्यांना माफी देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. मात्र या योजनेनुसार बलात्कार, खून वा भ्रष्टाचार प्रकरणातील राजकारण्यांसह दोषी कैद्यांना माफी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आपली निम्मी शिक्षा भोगलेल्या 55 वर्षांवरील महिला आणि 60 वर्षांवरील पुरुष कैदी, त्याचप्रमाणे अन्य काही प्रवर्गातील कैद्यांना 2 ऑक्‍टोबर 2018, 6 एप्रिल 2019 आणि 2 ऑक्‍टोबर 2019 रोजी शिक्षेतून माफी देण्यात येणार असल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या सदर शिक्षा माफीसाठी पात्रतेचे निकष आणि मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना पाठवल्या असून 15 ऑगस्टपर्यंत माफीसाठी पात्र कैद्यांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार माफीस पात्र असलेल्या कैद्यांची पहिली तुकडी 2 ऑक्‍टोबर 2018 रोजी मुक्त करण्यात येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)