बलात्कारासंदर्भात केंद्रीय मंत्र्याकडून असंवेदनशील वक्‍तव्य

लखनौ – देशभर बलात्काराच्या विषयावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त होत असतानाच केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी अत्यंत असंवेदनशील व्यक्तव्य करून नवीन वाद निर्माण केला आहे. भारतासारख्या मोठ्या देशामध्ये जर 1-2 बलात्कार झाले तर त्यावरून मोठा गहजब निर्माण केला जाऊ नये, असे ते म्हणाले. जम्मू काश्‍मीरमधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नावमधील बलात्कार प्रकरणामध्ये भाजपा आमदाराचे नाव पुढे आल्याच्या पार्श्‍वभुमीवर गंगवार यांनी हे असंवेदनशील विधान केले आहे.

“बलात्काराच्या घटना दुर्दैवी आहेत. मात्र तुम्ही या घटना थांबवू शकत नाही. सरकार सर्वत्र सक्रिय आहे आणि ज्या गोष्टी लोकांना दिसत आहेत, त्यावर सरकार कारवाई करत आहे.’ असे गंगवार यांनी काल बरेली इथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. भारतासारख्या मोठ्या देशामध्ये जर 1-2 बलात्कार झाले तर त्यावरून गहजब व्हायला नको. सरकार पुरेशी परिणामकारक पावले उचलत आहे. जे काही आवश्‍यक असेल, त्याबाबत सरकार निश्‍चितच कारवाई करेल, याचवेळी बोलताना ते पुढे म्हणाले.

-Ads-

संतोष गंगवार हे भाजपाचे बरेली येथील खासदार आहेत आणि केंद्रामध्ये कामगार कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) आहेत.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्याच्या अध्यादेशास मंजूरी दिली गेली होती. या अध्यादेशावर राष्ट्रपतींनी आज स्वाक्षरीही केली आहे. बलात्काराच्या कोणत्याही गुन्हेगारास सोडले जाणार नाही, असे कठुआ आणि उन्नावच्या घटनांबाबत प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते.उन्नाव येथील घटनेसंदर्भात सीबीआयने भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगरना 13 एप्रिल रोजी अटक केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)