बलात्काराचा आरोप असलेल्या विश्‍वस्ताला शाळेत प्रवेशबंदी

मुंबई – अंधेरी येथील आंतरराष्ट्रीय शाळेच्या बलात्काराचा आरोप असलेल्या विश्‍वस्ताला उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. पुढील आदेश होईपर्यंत शाळेत प्रवेश करून नये, असा आदेशच न्या. साधना जाधव यांनी फ्रेंच नागरिक विश्‍वस्ताला दिला.

या फ्रेंच नागरिक असलेल्या या विश्‍वस्ताला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती त्यानंतर त्याची गेल्यावर्षी नोव्हेबर मध्ये जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर तो पुन्हा शाळेत रुजू झाला. हा जामीन रद्द केला जावा, अशी विनंती करणारी याचिका पिडीतेच्या आईने आणि अन्य 42 विद्यार्थ्यांच्या पालकांनीही उच्च न्यायालयात दाखल केली होती. सुरक्षेबाबत भिती व्यक्त करत दाखल केलेल्या या याचिकेची दखल घेत आरोपीला शाळेपासून दूर ठेवण्याची विनंतीही याचिकेमध्ये होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली.

यावेळी याचिकाकर्त्यांनी आरोपी विश्‍वस्ताला जामीन मंजूर करण्याचा सत्र न्यायालयाचा निकाल कायद्याला धरून नव्हता, असा दावा केला. तर आरोपीच्यावतीने सत्र न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचा दावा केला गेला. उभयपक्षांच्या युक्तीवादानंतर न्या. साधना जाधव यांनी फ्रेंच विश्‍वास्थाला पुढील आदेशापर्यंत शाळेत जाण्यास मनाई केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)