बलात्कारप्रकरणी संस्थेवर गुन्हा दाखल करा

शिक्रापूर-येथील महाविद्यालयीन युवतीवर विद्यालयातील शिक्षकाकडून बलात्कार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आल्याने शिक्रापूरकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज (शनिवारी) शिक्रापूर येथे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकारी व ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होते. यावेळी ग्रामस्थांनी विद्यालयाच्या प्रशासनावर ताशेरे ओढत युवतीवरील बलात्कार प्रकरणी संस्थेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
शिक्रापूर येथे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत असलेल्या विद्याधाम प्रशाला या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवतीवर सुनील आबासाहेब जानकर या शिक्षकाकडून दोन वेळा बलात्कार झाल्याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाल्याने ग्रामस्थांकडून घडलेल्या घटनेबाबत निषेध व्यक्त करण्यात आला. घडलेल्या प्रकारामध्ये विद्यालय प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचे सर्वांनी सांगितले. तर विद्यालयातील शिक्षक हे चांगल्या प्रकारे वागत नसल्याचे, शाळेतील शिक्षकांचे अवैधरित्या खासगी क्‍लासेस सुरू असून मुख्याध्यापकांना त्यातून आर्थिक लाभ होत असल्याबाबत काहींनी सांगितले. त्यामुळे शिक्षकांनी खासगी क्‍लास बंद कारावे, विद्यालयात शिक्षक व विद्यार्थ्यांना मोबाईल बंदी, महाविद्यालयीन वेळेत शिक्षकांनी बाहेर जाऊ नये, ज्या शिक्षकांबद्दल तक्रारी आहेत त्यांची तत्काळ बदली करावी, गावच्या वतीने शालेय कमिटी नेमावी, मुख्याध्यापक बदली करावी, प्रत्येकी दोन महिन्यांत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व ग्रामस्थांची बैठक घ्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. याप्रसंगी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तु. म. परदेशी, विद्याधाम प्रशालाचे प्राचार्य सोनबापू गद्रे, उपप्राचार्य रामदास शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, ऍड. कमल सावंत, यशस्विनी सामाजिक अभियानच्या प्रमुख दिपाली शेळके, पुणे प्रादेशिक बाजार समितीचे संचालक बाळासाहेब चव्हाण, सरपंच जयश्री भुजबळ, उपसरपंच आबाराजे मांढरे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक अरुण करंजे, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, दत्ता गिलबिले, ग्रामपंचायत सदस्या जयश्री दोरगे, भगवान वाबळे, सागर सायकर, सुभाष खैरे, राजाभाऊ मांढरे, उद्योजक रमेश थोरात, बाळासाहेब दाभाडे, शरद मांढरे, ऍड. अतुल ताजणे, अक्षय मांढरे, तुषार आळंदीकर, मंगेश चव्हाण यांसह आदी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
बलात्काराचा गुन्हा करणाऱ्या शिक्षकाला आम्ही निलंबित केले असून त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तु. म. परदेशी यांनी सांगितले; परंतु यावेळी उपस्थित सर्वांनी महाविद्यालय प्रशासनाबाबत सर्वांनी नाराजी व्यक्त केली.

  • संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची बैठकीला दांडी
    शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशाला येथे महाविद्यालयीन युवतीवर विद्यालयातील शिक्षकाकडून बलात्कार झाल्याने झालेल्या घटनेमध्ये संस्था चालकांचा व महाविद्यालय प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्यामुळे त्यांची बैठक शिक्रापूर येथे आयोजित करण्यात आली होती; परंतु यावेळी शिरूर शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष गैरहजर होते. फक्त सचिव तु. म. परदेशी हे उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या प्रश्नांना त्यांनी गांभीर्याने न घेत उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)