बलात्कारप्रकरणी पोलीस कोठडी

पुणे- घरकामाला येणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 48 वर्षीय व्यक्तीला हडपसर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला 2 जूलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दत्ता मारूती जाधव (वय 48, रा. फुरसुंगी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत 60 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. जानेवारी 2018 पासून आतापर्यंत वारंवार ही घटना घडली. 14 वर्षीय पीडित मुलगी ही जाधव याच्या घरी आधून-मधून घरकामासाठी जात होती. जानेवारी महिन्यामध्ये ती जाधव याच्या घरी गेली होती. त्यावेळी घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत जाधव याने पीडित मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर त्याने जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी जाधव याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने वरील निर्णय दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)