बलात्कारप्रकरणी तरुणावर गुन्हा

पिंपरी – एका 23 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे घडली.

अमित प्यारे गोंड (वय-27, रा. शिवगणेश नगर, धावडे वस्ती, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत 23 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 नोव्हेंबर 2018 रोजी अमित याने त्या तरुणीला जबरदस्तीने मॅक्‍झीन चौक, दिघी येथील दीप लॉजवर नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)