बर्फाचे पाणी पिणे योग्य आहे का ?

तुम्ही कडक उन्हातून आला आहात, घशाला कोरड पडली आहे. यातच थंडगार बर्फाचे पाणी पिण्यास मिळाले तर कोणीच नाही म्हणणार नाही. या दिवसात थंडगार खाण्या-पिण्याची प्रत्येकालाच इच्छा होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का, हे बर्फाचे पाणी आरोग्याला घातक ठरते. यामुळे फ्रिजमधील बर्फयुक्त पाणी पिण्यापेक्षा तुम्ही माठातील किंवा नॉर्मल पाणी प्या.

अतिथंड पाणी पिण्यामुळे शरीरात तयार होणाऱ्या पाचक रसाचे तापमान कमी होते. यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. परिणामी गॅसेसचा त्रास होण्याची दाट शक्‍यता असते.

बर्फयुक्त थंड पाणी पिल्यास पचन क्रियेचा वेग कमी होतो. जेवण केल्यावर त्वरित असे पाणी पिणे टाळा. यामुळे पोटातील ऍसिडचे चरबीत रुपांतर होऊन लठ्ठपणा वाढतो. तसेच कफाचा त्रास होऊ शकतो. शरीरात कफाचे प्रमाण अधिक झाल्यास तुमची रोग प्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे जेवणानंतर लगेच थंड पाणी पिण्याऐवजी थोड्या वेळाने सामान्य पाणी प्यावे.

थंड पाणी प्यायल्यानंतर शरीराचे तापमान मेंटेन करण्यासाठी शरीराला मोठ्या प्रमाणात एनर्जी खर्च करावी लागते. याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो.

या पाण्यामुळे रोगप्रतिकार क्षमता कमी होते. यामुळे ऍलर्जी तसेच आजारांची भीती वाढते.

हे पाणी हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचेही एका संशोधनात आढळून आले आहे. यामुळे असे पाणी पिणे टाळून सामान्य पाणी पिणेच योग्य ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)