“बर्निंग टेम्पो’चा चिंचवडमध्ये थरार

पिंपरी – इंजिनमधील बिघाडामुळे धावत्या टेम्पोला आग लागली. हा थरार शनिवारी (दि. 11) दुपारी दोनच्या सुमारास चिंचवडमधील चापेकर उड्डाणपुलावर घडला.

डांगे चौकाच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला (एमएच 12, एचडी 0220) अचानकपणे आग लागली. टेम्पोच्या इंजिनमधून येणारा धूर चालक प्रवीण लांडगे याच्या लक्षात येताच त्याने गाडी जागीच थांबवून त्यातून उडी मारली आणि क्षणार्धात टेम्पोच्या आगीने उग्र रुप धारण केले. या घटनेची वर्दी स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलास दिली.

त्यानुसार पिंपरी अग्निशमन केंद्राची एक व निगडी प्राधिकरण केंद्राच्या अशा दोन गाड्या दाखल झाल्या. त्यांनी वीस मिनिटात ही आग विझवली. यामध्ये टेम्पोसह त्यातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून टेम्पोचा केवळ सांगाडा उरला आहे. यात सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. लिडींग फायरमन अशोक कानडे, मयुर कुंभार, विनेश वाटकरे, अमोल चिपळूणकर, चेतन माने, विशाल जाधव या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)