बरेलीत “भैरवनाथ’च्या विद्यार्थिनीने जिंकली मने

केडगाव – खुटबाव (ता. दौंड ) येथील भैरवनाथ महाविद्यालयाची विद्यार्थिनी शितल निंबाळकर आणि तिच्या सहकाऱ्यांनी बरेली उत्तरप्रदेश येथे मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.उत्तरप्रदेश राज्यातील बरेली येथे राष्ट्रीय सेवा योजनेतील निवडक विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय एकात्मता शिबिर भारत सरकारतर्फे 13 ते 19 नोव्हेंबर या कालावधित सुरू होते. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या 10 विद्यार्थ्यांच्या संघाने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात त्यांनी मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित सर्वांची वाहवा मिळवली, अशी माहिती खुटबाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी दिली. तिच्या या कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक माजी आमदार रमेश थोरात, चेअरमन पोपट थोरात, सचिव सुदाम भापकर, सहसचिव सूर्यकांत खैरे यांनी शितलचे कौतुक केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)