बरेच स्टार्टअप अयशस्वी होण्याची शक्‍यता…

जयपूर – स्टार्टअपला भारतामध्ये चांगले भविष्य आहे; मात्र बाजारातील प्रतिकूल परिस्थिती व इतर बाबींचा आढावा घेता साठ टक्के स्टार्टअप अपयशी ठरतील, अशी शक्‍यता इन्फोसिसचे माजी संचालक मोहनदास पै यांनी व्यक्त केली. भारतामध्ये 30 हजार स्टार्टअपद्वारे साडेतीन लाख लोकांना रोजगार उपलब्ध होत असून, त्यामध्ये पाच ते सहा हजार रोजगारांची वाढ होत आहे, असेही पै म्हणाले.

गेल्या वर्षी 13.65 अब्ज डॉलरची स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यात आली होती. आजघडीला या स्टार्टअपची किंमत 95 अब्ज डॉलरच्या घरात पोचली आहे. 2025 पर्यंत सक्रिय स्टार्टअपच्या माध्यमातून 32 लाखांवर रोजगारनिर्मिती होणार असल्याचे पै म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)