बरड गोळीबाराची सीआयडी चौकशी करावी

जय मल्हार क्रांती संघटनेचा बेमुदत उपोषणाचा इशारा

फलटण, दि. 8 (प्रतिनिधी) – बरड, ता. फलटण येथे गुलाब भंडलकर यांच्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर व सुत्रधार अद्याप फरारी आहेत. तरीही पोलिस प्रशासन तपासात दिरंगाई करत आहे. हल्लेखोरांना अटक झाली नाही तर दि. 18 पासून उपोषण करण्याचा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान, गोळीबाराची सीआयडी चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

याबाबत जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुलाब भंडलकर यांच्यावर झालेला गोळीबार व प्राणघातक हल्लाची लवकरात लवकर सीआयडीमार्फत चौकशी व्हावी व संबधित गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी, अन्यथा 18 जानेवारी 2019 ला जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल. पोलिस प्रशासनाकडून या प्रकरणात दिरंगाई होत आहे. याबाबी गांभीर्याने घेण्यात याव्यात, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.

यावेळी मोहन मदने, बबनराव खोमणे, मेजर अंकुश जाधव,गंगाराम जाधव, ऍड. राहूल मदने, संजय जाधव, बाळासाहेब मदने, डॉ. सुभाष गुळवे, अरविंद जाधव, राजाभाऊ शिरतोडे, मेजर भारत जाधव, शाहुजी मदने, किरण खोमणे, नितीन मदने, रामदास मदने, शामराव मदने, आनंदराव जाधव, नानासाहेब मदने, प्रशांत चव्हाण, गणेश शिरतोडे, लखन आडके, बापुराव शिरतोडे, सुनील जाधव, धनाजी जाधव, लालासाहेब मसुगडे, लालासो आडके, अक्षय जाधव, सागर जाधव, शिवाजी जाधव व समाज बांधव उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)