बरड गोळीबाराची नि:पक्षपाती चौकशी करावी

गुणवरे ग्रामस्थांची मागणी : गावडे कुटुंबीयांवरील आरोप खोटे

फलटण – बरड गोळीबार प्रकरणात विजय गावडे व त्यांच्या कुटुंबियांवर केलेले आरोप खोटे असून त्याची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे गुणवरे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांना केली आहे.
गुणवरे ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बरड येथे झालेल्या गोळीबारात विजय सदाशिव गावडे यांचा काहीही संबंध नसताना त्यांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वास्तविक गुलाब भंडलकर उर्फ गोट्या हाच गुन्हेवारी प्रवृत्तीचा असून त्याने व अन्य आठ-दहा जणांनी मे 2017 मध्ये भैरवनाथ यात्रेच्या कालावधीत पोलीस निरीक्षक दयानंद सदाशिव गावडे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. अनेक वर्षांपासून जमिनीचा बेकायदेशीरपणे ताबा घेणे, संबंधीत शेतकऱ्यांना वेठीस धरणे व पैशांची लुबाडणुक करणे हे
त्याचे धंदे आजही सुरू आहेत. फलटण शहर, पिंपरद, निंबळक, बरड, गुणवरे व इतर गावांमध्ये तो हस्तकामार्फत बेकायदेशीर सावकारी करत आहे.

सावकारी करून शेतकऱ्यांची शेतजमीन स्वतःचे नावावर करुन त्याच्याकडून अव्वाच्या सव्वा रक्कम घेतल्याची कित्येक उदाहरणे आहेत. भंडलकर याच्यावर झालेल्या गोळीबाराबाबत विजय गावडे व त्यांचे कुटुंबीय यांचा कोणत्याही प्रकारचा काडीमात्र संबंध नाही. केवळ गावडे कुटूंबियांना बदनाम करण्याच्या उद्देशाने खोटा आरोप करीत आहे. भंडलकर सारख्या गुन्हेगारी वृत्तीला पाठीशी घालू नये. बरड गोळीबारप्रकरणी नि:पक्षपातीपणे चौकशी करावी व दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. सखोल चौकशी न करता विजय गावडे यांना अटक करणे हे या कुटुंबावर अन्याय केल्यासारखे होणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)