‘बबन’ चित्रपटाचा तीन दिवसात 3.25 कोटींचा गल्ला

भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे लिखित आणि दिग्दर्शित ‘बबन’ या मराठी सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवर लव्ह स्टोरी असलेल्या या सिनेमाने बॉक्‍स ऑफिसवर चांगलाच गल्ला केला आहे.

महाराष्ट्रात ‘बबन’ सिनेमाचे शोज 200 हून 240 करण्यात आले आहेत. त्यामुळे खास प्रेक्षकांसाठी महाराष्ट्राच्या सिनेमागृहात ‘बबन’चे 400 हून 500 शो वाढवले असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई बाहेरील सिनेमागृहात ‘बबन’ सिनेमाच्या तिकीट खिडकीवर हाऊसफुलची पाटी झळकत आहे. या तीन दिवसात सिनेमाने बॉक्‍स ऑफिसवर 3.25 करोडचा गल्ला कमावला आहे. द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत, चित्राक्ष फिल्म्स निर्मित आणि भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित ‘बबन’ हा सिनेमा 23 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)