भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित चित्रपट ‘बबन’ने आता थेट सिंगापूर गाठले आहे. सिंगापूरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मराठी लोकांना चित्रपटाचा आस्वाद घेता यावे यासाठी तेथील स्थानिक सिनेरसिकांनी ‘बबन’च्या खास स्क्रीनिंगची मागणी केली आहे. यानुसार सिंगापूरमध्ये ‘बबन’ हा चित्रपट १५ एप्रिल रोजी दाखविण्यात येणार आहे. 

या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव हे मध्यवर्ती भूमिकेत आहे. ग्रामीण जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या कथेसोबत यातील गाणीही सुपरहिट ठरली आहेत. महाराष्ट्रातील यशानंतर बबन आता सिंगापूरमध्येही आपली कमाल दाखवणार हे निश्चित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)