बना सोशल मीडिया तज्ज्ञ

सध्याच्या मोबाइलच्या विश्‍वात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या साधारण 50 टक्के लोकांचे वय 30 वर्षांपेक्षा कमी आहे. यातील अनेक जण त्यांचा बहुमूल्य वेळ सोशल मीडियावर व्यतीत करतात. आजच्या काळात उत्पादक कंपन्यानही एखाद्या उत्पादनाचे लॉन्चिंग, बिझनेस मार्केटिंग यासोबतच बिझनेस कम्युनिकेशन आणि रिसर्च यासारखे काम सोशल मीडियाच्यामाध्यमातून करत आहे.

त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत. सोशल मीडिया जर तुमची पॅशन असेल तर तुम्ही देखील यामध्ये करिअर करू शकता. यासाठी गरज आहे ती केवळ काही कौशल्ये विकसित करण्याची. अशी कौशल्ये असणाऱ्या उमेदवाराला गूगल, फेसबूक, लिंक्‍डइन आणि ट्विटर यांसह अनेक इलेक्‍टॉनिक्‍स कंपन्या, आयटी क्षेत्रात कामाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

-Ads-

पात्रता – या क्षेत्रामध्ये येण्यासाठी विशिष्टि शैक्षणिक पार्श्‍वभूमीची आवश्‍यकता नाही. कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी यामध्ये करिअर करू शकतो. यामध्ये काम करण्यासाठी तुमच्याकडे कम्युनिकेशन स्कील चांगले असले पाहिजे. या क्षेत्रात क्‍लायंट सोबत रायटिंगमध्ये डिल केली जाते त्यामुळे तुमच्याकडे रायटिंग स्कील्स असणे गरजेचे आहे. डिजिटल मीडियातील सोशल मीडिया, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनस, ई-मेल मार्केटिंग, मोबाइल मार्केटिंग, एफिलिएटेड मार्केटिंग यांची माहिती असणे गरजेच आहे.

कामाचे स्वरूप – सोशल वेबसाईट्‌सच्या माध्यामातून एखादी वस्तू अथवा सेवा यांची प्रसिद्धी करून ती लोकप्रिय बनवण्याचे काम या क्षेत्रातील उमेदवारांना पार पाडावे लागते. यासाठी एखादी कंपनी तुम्हाला चांगला परतावा देऊ शकेल.

येथे आहे नोकरीची संधी – ज्या डिजिटल मार्केटिंग एजन्सी दुसऱ्या कंपन्यांसाठी काम करतात अशा ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते. याखेरीज अनेक कंपन्या स्वतःच डिजिटल मार्केटिंगसाठी तज्ज्ञांची निवड करतात. ई-कॉमर्स, एफएमसीजी, मीडिया, आयटी, ट्रॅव्हल, फायनान्स, बॅंकिंग यासारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया तज्ज्ञांची मागणी असते.

त्याशिवाय आज अनेक कंपन्या सोशल मीडिया स्पेशालिस्ट हायर करत आहेत. या तज्ज्ञांकडून सोशल साइट्‌सवर प्रॉडक्‍ट लॉंचिंग, ग्राहकांसोबत चर्चा करणे आणि संशोधन करणे यासारखे काम केले जाते. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई येथे या क्षेत्रामध्ये चांगल्या संधीसाठी आहेत. सुरुवातीच्या काळात उमेदवारांना साधारण 15 ते 20 हजार वेतन मिळू शकते.
 

प्रमुख कोर्स

सर्टिफाइड डिजिटल मार्केटिंग मास्टर कोर्स

सर्टिफिकेशन प्रोग्राम इन डिजिटल मार्केटिंग

प्रोफेशनल डिप्लोमा इन सोशल मीडिया मार्केटिंग

प्रोफेशनल डिप्लोमा इन सर्च मार्केटिंग

प्रोफशनल डिप्लोमा इन मोबाइल मार्केटिंग

अंजली महाजन

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)