बनावट हेल्मेट उत्पादकांविरोधात सचिन तेंडूलकरची तक्रार

नवी दिल्ली – महान क्रिकेटपटू आणि राज्यसभेतील खासदार सचिन तेंडूलकर यांनी कमी प्रतिच्या हेल्मेट उत्पादकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दुचाकीचालकांच्या सुरक्षिततेसाठी कमी प्रतिच्या हेल्मेट उत्पादकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र सचिन तेंडूलकर यांनी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पाठवले आहे. देशात दुचाकी चालकांचे अपघात मोठ्या संख्येने होत असतात. त्यामुळे या चालकांच्या सुरक्षिततेसाठी असलेले हेल्मेट उच्च प्रतिचे असायला हवे, असे सचिननी म्हटले आहे.

“कमी प्रतिचे साहित्य वापरून आणि बनावट आयएसआय मार्क वापरून विकल्या जाणाऱ्या हेल्मेटवर कारवाईचा विचार करण्यात यावा. एक खेळाडू म्हणून प्रत्यक्ष मैदानावर खेळायला जाताना उच्च प्रतिच्या सुरक्षा साहित्याचा वापर करण्याचे महत्व आम्ही जाणतो. तशाच प्रकारचे उच्च प्रतिचे हेल्मेट रस्त्यावर दुचाकी चालवणाऱ्यांसाठी असायला हवे.’ असेही सचिननी म्हटले आहे.

देशातील दुचाकी अपघातात मरण पावलेल्यांपैकी 70 टक्के जणांनी बनावट हेल्मेट खरेदी केलेले असते. रस्त्यांवरील एकूण अपघातांमध्ये दुचाकीचालकांचे प्रमाण 30 टक्के एवढे असते. त्यामुळे कुचकामी हेल्मेटचा वापर दुचाकी चालकांसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे अपघातग्रस्त व्यक्‍ती बचावण्याची शक्‍यता 42 टक्‍क्‍यांनी वाढते. चांगल्या प्रतिच्या हेल्मेटची किंमत कमी करण्यात यावी. त्यामुळे कमी प्रतिचे हेल्मेट खरेदी होण्याची शक्‍यता कमी होईल, असे सचिननी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)