बनावट प्रमाणपत्राला पायबंद बसणार

केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर : पदवी प्रमाणपत्रांची डिजिटल नोंदणी होणार

पुणे – देशातील सर्व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीवर डिजिटल पद्धतीने नोंदणी करून आणि जतन करून ठेवण्यात येणार आहे. याद्वारे ऑनलाइन प्रणाली प्रमाणपत्रांची सत्यता तत्काळ पडताळून पाहणे शक्‍य होणार असून, बनावट प्रमाणपत्राला पायबंद बसणार आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या 20व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी संत शिरोमणी जैन आचार्य विद्यासागरजी महामुनीराज यांना विद्यापीठाची डी. लिट. ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, कुलसचिव जी. जयकुमार, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. विश्वास धापते उपस्थित होते.

पदवी प्रमाणपत्रावर फोटो अनिवार्य करण्यात आले आहे, असे सांगून जावडेकर म्हणाले की, प्रमाणपत्रे डिजिटल पद्धतीने जतन ठेवण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्राची डिजिटल अथवा प्रिंटेड कॉपी विनासायास उपलब्ध होईल. तसेच सर्व संबंधितांना राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीमार्फत ऑनलाइन प्रणालीद्वारे प्रमाणपत्रांची सत्यता तत्काळ पडताळून पाहणे शक्‍य होणार आहे. अमेरिकेतही नोकरी मिळाल्यास ऑनलाइन पद्धतीने याद्वारे कागदपत्रांची पडताळणी करणे सोयीचे असून, हे विद्यार्थ्यांना उपयुक्‍त ठरणार आहे.

शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाजऋण फेडण्यासाठी आणि राष्ट्राला उन्नत करण्यासाठी केला पाहिजे. काळाची पावले ओळखून अभ्यासक्रम सतत अद्ययावत केले पाहिजेत. बदल स्वीकारण्याची मानसिकता शिक्षण क्षेत्रात असली पाहिजे. आज डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून 1 लाख 80 हजार ग्रंथ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी विद्यार्थ्यांना ध्येय आणि मुल्यांप्रती अढळ राहण्याचा संदेश दिला. कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे विद्यापीठाचा अहवाल सादर केला. प्रा. राजेंद्र उत्तूरकर आणि डॉ. ज्योती मंडलिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

अर्थसंकल्पात शिक्षणावर तरतूद वाढली

शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबरच गुणवत्ता वाढीसाठी केंद्रसरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. यापूर्वीच्या अर्थसंकल्पात 47 हजार कोटी रुपये असलेला हा निधी सव्वालाख कोटीपर्यंत वाढविला आहे. समग्र शिक्षा, रूसा, विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे दिले जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेतही अर्थसंकल्पात वाढ करण्यात आले, याकडे प्रकाश जावडेकर यांनी लक्ष वेधले.

विद्यापीठाच्या पदवीप्रदानचा पोशाखात बदल करण्याचे आदेश सर्व विद्यापीठांना दिले होते. त्यानुसार 900 पैकी 500 विद्यापीठांनी भारतीय पोशाख बदललेले आहेत. तेही त्याच विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या डिझाइननुसार पोशाख सर्वांना बंधनकारक केले आहे. अन्य विद्यापीठांनीही विद्यार्थ्यांच्या डिझाईननुसार पदवीप्रदानच्या पोशाखात बदल करण्याचे जावडेकर यांनी सूचित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)