बनावट नोटा वटविणाऱ्यांना पोलीस कोठडी

आळेफाटा-निवडणुकीसाठी सुट्ट्या पैशांची व्यवस्था करण्याच्या योजनेने आलेल्या पाबळच्या एकाला 10 लाखांचे 12 लाख देतो असे आमिष दाखवणाऱ्या बंटी आणि बबलीच्या ठकबहाद्दर टोळीला आळेफाटा पोलिसांनी जेरबंद केले. या प्रकरणाचा कसून तपास करत एकाच रात्रीत दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. आज जुन्नर न्यायालयात हजर केले असून त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या ठकबहाद्दर टोळीला पुणे जिल्ह्यातील विविध गावे व शहरातून चार पोलीस कर्मंचाऱ्यांनी जाऊन एकाच रात्रीत अटक केली. त्यामुळे या चार कर्मचाऱ्यांचे चांगल्या कामगिरीबद्दल आभिनंदन केले जात आहे.
याबाबत संतोष नामदेव मोरे (वय 32, रा. पाबळ, ता. शिरूर) यांनी आळेफाटा पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी मनाली महेश जोशी (रा. आकुर्डी, पिपंरी-चिंचवड, पुणे), समीर कल्याण अग्रवाल (रा. लोणी काळभोर, ता. हवेली), अंकुश आनंदा साळके (रा. जवळे, ता. पारनेर, जि. अहमदनगर), प्रकाश लक्ष्मण कांबळे (रा. भूगाव, ता. मुळशी), सुरेंद्र दशरथ खटावकर (रा. कोथरूड, पुणे), रजनीकांत अनंत डिकले (रा. विश्रांतवाडी, पुणे), रमेश रामचंद्र बर्शीले (रा. जवळे, ता. पारनेर, जि. अहमदनगर), प्रशांत संभाजी डेरे (रा. केंदूर, ता. शिरूर), संतोष दत्तात्रय घोडेकर (रा. पाबळ, ता. शिरूर), अजय रतनलाल अग्रवाल (रा. येरवडा, पुणे) या ठगांना रात्रीत ताब्यात घेतले आहे.
याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाबळचे संतोष मोरे यांना “तुम्ही आम्हांला सुट्टे दहा लाख रुपये द्या, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला बंदे 12 लाख रुपये देतो असे आमिष दाखवून यातील आरोपींनी 22 ऑक्‍टोबरला मोरे यांच्याकडील दहा लाख रुपये घेऊन त्यांना 12 लसाख रुपयांचय बनावट नोटा दिल्या. बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्यांना आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक व्ही. जी. लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल एन. आर. कारखेले, एच. एस. करे, टी. टी. इस्टे, एस. एस. सूर्यवंशी यांनी शिरूर, शिक्रापूर, चंदननगर, लोणी काळभोर, कोथरूड, येरवडा, विश्रांतवाडी, पुणे येथून तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यातून ताब्यात घेतले. इतर दोन फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, अधिक तपासात मोठ्या प्रमाणात रॅकेट सापडण्याची शक्‍यता येत आहे.
या घटनेचा तपास करणाऱ्यांमध्ये पोलीस नाईक एन. व्ही. लोंढे यांना मागील काळात चांगल्या कामगिरीच्या जोरावर पोलीस दलात गौरवण्यात आले आहे.

  • आणखीं नावे उघडकीस येण्याची शक्‍यता
    यामध्ये एक आरोपी रजनीकांत डिकले हा पुणे आणि नारायणगाव येथील राष्ट्रीय बॅंकेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यंरत होता. त्याच्या जोडीला मनाली जोशी ही सक्रीय होती. याच बंटी-बबलीच्या जोडीला अटक करून, त्यांच्या सहकार्यांने इतरांना ताब्यात घेतले. या संबंधित आरोपींवर फसवणुकीचा आणि बनावट नोटांचा कायदेशीर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये अजुनही जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील काही धेंडं सापडण्याची शक्‍यता आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)