बनावट नोटा प्रकरणांचा आकडा वाढला; नोटाबंदीनंतर समोर आली माहिती

नवी दिल्ली : नोटाबंदी निर्णयाचे काही फायदे आता समोर येत आहेत. गेल्या काही वर्षांत बनावट नोटा तयार करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे.

अहवालात म्हटल्यानुसार, बँका आणि अन्य आर्थिक संस्थांमध्ये बनावट करन्सीच्या व्यवहारात २०१६-१७ मध्ये ३.२२ लाख प्रकरणे समोर आली होती. तर २०१५-१६ मध्ये हा आकडा ४.१० लाख इतका होता. मात्र नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर २०१६-१७ मध्ये बनावट नोटांची तब्बल ७.३३ लाख प्रकरणे बाहेर आली आहेत. विशेष म्हणजे, बनावट नोटा रोखण्यासाठी अहवाल तयार करण्याचे काम २००८-०९ मध्ये सुरू करण्यात आले होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)