बनावट नोटा तयार करणाऱ्या दोघांना अटक

बीड, दि. 20 (प्रतिनिधि) – बनावट नोटा तयार करून त्या चलनात आण्याच्या प्रयत्नात असणारी एक टोळी आष्टी पोलिसांच्या सतर्कतेमुळे रंगेहाथ पकडण्यात आली आहे. यातील सर्व आरोपी हे स्थानिक असून या घटनेमुळे आष्टी शहरात खळबळ उडाली आहे. बनावट नोटा तयार करण्याचे लोन आता आष्टी सारख्या ग्रामीण भागात पोहचल्याने आष्टीकरांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शंकाही व्यक्त केली जात आहे.

शहरातील हैद्राबाद बॅंकेसमोर एका झेरॉंक्‍स दुकानात बनावट नोटा तयार करण्याचे काम आरोपी शाहनवाज खान व भारत लबडे हे दोघेजण करत असल्याची माहिती पोलिसाना मिळाली. त्यानुसार सोमवारी सायंकाळी साडे आठ वाजता एडीएस पथकाचे एपीआय श्रीकांत उबाळे, पोलीस नाईक गणेश दुधाळ यांनी या दोन्ही आरोपीना रंगेहात पकडले. त्यांच्याकडे दोन हजार, पाचशे, आणि शंभरच्या बनावट नोटा सापडल्या. हि सर्व रक्कम जवळपास दोन लाख इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)