बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना कोठडी ; 50 हजारांच्या बनावट नोटा जप्त

वंजारगल्लीतील छापखान्यावर शहर पोलिसांचा छापा 

नगर: शहराच्या मध्यवर्ती भागातील वंजारगल्लीत बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. मुकेश अशोक फंड (वय 40) व संतोष प्रभाकर धीवर (वय 30) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने या दोघांना मंगळवारपर्यंत (ता. 8) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मंगलगेट येथील वंजारगल्ली येथे बनावट नोटा छापण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याशी शिंदे यांनी संपर्क साधून ही माहिती दिली. मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रवींद्र पिंगळे, सहायक फौजदार राजेंद्र खोंडे, पोलीस कर्मचारी रामदास सोनवणे, हेमंत खंडागळे, अभिजीत अरकल यांनी वंजारगल्लीतील छापखान्यावर छापा घातला. फंड आणि धीवर हे दोघे बनावट नोटांशी खेळत होते. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत या दोघांनाही उत्तरे देता आले नाही.

पोलिसांनी फंड आणि धीवर यांच्यासह छापखान्याची तपासणी केली. त्यावेळी 50 हजार 600 रुपयांच्या बनावट चलनी नोटा आढळून आल्या. त्यात दोन हजार रुपयांच्या 20, पाचशे रुपयांच्या 20 आणि 200 रुपयांच्या तीन बनावट नोटा वापरल्या. या नोटा छापण्याचे साहित्य देखील पोलिसांनी जप्त केले आहे. त्यात कलर प्रिंटर कम झेरॉक्‍स मशिन, संगणक, मॉनिटरवर पाचशे रुपयांची चलनी नोट, कागद, लोखंडी कात्री, कटर असे एकूण 33 हजार 600 रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. मुकेश फंड आणि संतोष धीवर या दोघांना पोलिसांनी आज न्यायालयासमोर हजर केले होते. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. न्यायालयाने त्यावरून दोघांना मंगळवारपर्यंत (ता. 8) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)