बनावट नोटाप्रकरणी शुभम खामकरला साताऱ्यातून अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; राहत्या घरातून घेतला ताब्यात

सातारा, दि. 13 (प्रतिनिधी)

सांगली येथील एका हॉटेलसमोर पाचशे रुपयांच्या सतरा आणि दोन हजार रुपयांच्या चार अशा एकूण 21 बनावट नोटा महात्मा गांधी चौकी पोलिसांनी जप्त केल्या होत्या. या प्रकरणी गौस गब्बार मोमीन (वय 21, रा. आझाद कॉलनी, भारतनगर, मिरज) याला अटक करण्यात आल्यानंतर त्याला नोटा पुरवणाऱ्या शुभम संजय खामकर (रा. नवीन एमआयडीसी, सातारा) याच्यावरही गुन्हा दाखल दाखल करण्यात आल्यानंतर एका दिवसातच सातारा स्थानिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत महात्मा फुले पोलिस चौकीतील पोलिस हवालदार सुभाष पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली होती. एका हॉटेलसमोरील बॅंकेजवळ गौस मोमीन हा सोमवारी रात्री उशिरा संशयितरीत्या फिरत असतानाचा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.

त्यावेळी त्याच्याजवळ दोन हजार रुपयांच्या चार व पाचशे रुपयांच्या सतरा नोटा सापडल्या. त्या नोटा गौस याचा साताऱ्यातील मित्र शुभम खामकर याने दुसऱ्याला खपवण्यासाठी दिल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. त्या नोटा बनावट आहेत हे माहीत असताना देखील त्याने स्वतः जवळ बाळगल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करत तात्काळ अटक केली तर त्याचा साताऱ्यातील मित्र शुभम याच्या शोधासाठी पथके रवाना केली होती.

यावेळी सातारा गुन्हे शाखेने शुभम याला एमआयडीसी येथील त्याच्या रहत्या घरातून ताब्यात घेत सांगली पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)