बनावट दागिने तारण ठेवून फसवणूक करणारी टोळी जेरबंद 

कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेल्या टोळीत एक महिला आरोपी कोरेगावची 

कोल्हापूर: कोल्हापुर जिल्ह्यातील नामांकित बॅंका, पतसंस्था आणि सराफ व्यावसायिकांकडे बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून त्यांच्याकडून लाखो रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील नऊ जणांना पोलिसांनी अटक केली असून एक जण फरार झाला आहे. या टोळीकडून दोन किलो नऊ तोळे सोन्याचे बनावट दागिने जप्त केले आहेत. प्राथमिक तपासात 39 लाख 32 हजारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान हे बनावट सोन्याचे दागिने पुणे, मुंबई किंवा बेंगलोरमधून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेल्या टोळीत एक महिला आरोपी सातारा जिल्ह्यातील कोरेगावची आहे.

-Ads-

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बॅंका, पतसंस्था आणि सराफ व्यावसायिक यांच्याकडे बनावट सोने तारण ठेवून फसवणूक करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी चौकशी सुरू केली. या चौकशीच्या आधारे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक, आयसीआयसी बॅंक, वीरशैव बॅंक, दर्शन सहकारी पतसंस्था, भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स, शंकर गणपतराव शेळके ज्वेलर्स, महालक्ष्मी ज्वेलर्स यांच्याकडे असणाऱ्या सोन्याची तपासणी सुरू केली. यावेळी त्यांना दोन किलो नऊ तोडे बनावट सोनू आढळले.या बनावट दागिण्यांच्या आधारे फसवणूक करणाऱ्यांनी 39 लाख 32 हजार रुपयांचे कर्ज घेतले असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी टोळी प्रमुख चंद्रकांत भिंगार्डे यांच्यासह नऊ जणांना अटक केली आहे. या टोळीमध्ये दोन महिलांचा समावेश असून एक महिला सातारा जिल्ह्यातील कोरेगावची रहिवासी आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करण्यात आली.

टोळीत असलेल्यांची नावे 

चंद्रकांत शिवराम भिंगार्डे याने कोल्हापूर येथील अतुल निवृत्ती माने , विलास अर्जुन यादव , अमर दिनकर पाटील , भारती श्रीकांत जाधव , विक्रम मधुकर कोईगडे , राकेश रजनीकांत रणदिवे , पृथ्वीराज प्रकाश गवळी या कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यांची टोळी केली होती. सातारा जिल्ह्यातील कविता आनंदराव राक्षे ही आरोपी सुभाष नगर, कोरेगाव येथील असून फरार आरोपी कोल्हापूरचा आहे. त्याचे नाव, तानाजी केरबा माने आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)