बनावट खाती बनवून ईपीएफओमध्ये कोट्यवधींचा घोटाळा

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 4 कोटींचा हा घोटाळा असल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीतल्या एका कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने हा घोटाळा करण्यात आला आहे. भविष्य निर्वाह निधीतून कोट्यवधी रुपये काढण्यात आले आहेत.

दिल्लीच्या द्वारका सेक्टर -23 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, एफआयआर दाखल झाले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून या घोटाळ्याचा तपास सुरू केला आहे. तसेच चौकशीसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयातील एका कर्मचा-यालाही ताब्यात घेतले आहे. या कर्मचा-याकडून घोटाळ्याची व्याप्ती आणि या घोटाळ्यात कोण कोण सहभागी आहेत, याचा तपास सध्या केला जात आहे.

ऑनलाइन कॅश ट्रान्झॅक्शनची रक्कम खात्यांमध्ये जमा असलेल्या रकमेशी मेळ खात नव्हती. काही ट्रान्जेक्शनची माहिती तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विभागातील वरिष्ठ अधिका-यांनासुद्धा नाही. त्यामुळे आता या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या दिल्ली-एनसीआरसह पूर्ण देशातील खात्यात हा ऑनलाइन पद्धतीने घोटाळा झाला आहे. ऑनलाइन ट्रान्झॅक्शनचे काम कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विभागाने बाहेरच्या कंपनीला दिले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विभागानं ज्या कंपनीला हे काम दिले, त्या कंपनीनेच हा घोटाळा केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या कंपनीच्या कर्मचा-यांनी बनावट खाती उघडून त्यात हा पैसा जमा केल्याचाही पोलिसांना संशय व्यक्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)